पान ८ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ८
पान ८

पान ८

sakal_logo
By

00230
00232
मसाई पठार ः येथे परिसरात भारंगी व रान कारले या बहरलेला भाज्या.


मसाई पठार परिसरात बहरल्या रानभाज्या
दुर्मिळ, औषधी गुणधर्म ; संवर्धन आणि सेवनाबाबत प्रबोधनाची गरज


उत्तम महाडिक ः सकाळवृत्तसेवा
देवाळे, ता.८ ः पावसाळा सुरु झाला की पन्हाळा,बांधारी, मसाई पठार परिसरात माळरान,जंगल, डोंगर कपारी परिसरात दुर्मिळ नैसर्गिक रानभाज्या उगवतात.
यात पाथरी, शेंडवल, कडवी, कुर्डू, टाकळा, भारंगी, आळू, वाघाटी, घोळी, नाल, केना, रानकारले, मोरंगी, वेळू, तांदळी, माट, रानतोंदली व गुळवेल या रानभाज्या आढळतात. विविध औषधी गुणधर्म असणार्‍या वर्षातून एकाच ऋतुमध्ये मिळणार्‍या या रानभाज्या आवर्जुन खाव्यात. पण काळाच्या ओघात अनेक भाज्यांबद्दल माहिती नसल्यामुळे त्या खाण्यापासून लोक वंचित राहातात. जुन्या पिढीतील महिलांना या भाज्यांची त्यांच्या औषधी गुणधर्माची व रेसिपीची माहिती असल्याने त्यांच्याकडून नवीन पिढीला त्याची माहिती होणे गरजेचे आहे. ऐन पावसाळ्यात सलग दोन ते तीन महिने सहज उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्यांमुळे आरोग्य संतुलीत राहण्यास मदत होते. तसेच पचन संस्थेसह शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. या भाज्या आरोग्यवर्धक, शक्तीवर्धक, त्रिदोषहारक असून पौष्टिक असतात. यात कार्बोहायड्रेड, प्रोटीन, सॅपोनिन, सोडियम, पोटॅशियम व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या रानभाज्यांचे सेवन केल्यामुळे त्याचे शरिराला दिर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात. डोंगरी ग्रामीण भागात या रानभाज्या पावसाळी दिवसात मुबलक उपलब्ध होत असल्याने लोकांच्या दैनंदीन भोजनात सध्या या भाज्या आढळून येतात. तसेच शहरी भागात रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी या भाज्यांचे मोहोत्सव साजरे केले जात असून कुपोषणमुक्तीत रानभाज्यांमधील घटक द्रव्यांचा आवर्जुन विचार करायला हवा हा आग्रह वाढत आहे.


पावसाळ्यात ठराविक परिसरात उगवणाऱ्या या भाज्यांच्या अधिवास संवर्धन होणे गरजेचे असून या भाज्या सर्वांनी आवर्जून खाल्या पाहिजे.
तसेच पावसाच्या पाण्यावर या भाज्यांचे परसबागेतही उत्पादन घेता येईल.
- अनिल चौगले, कार्यवाह, निसर्गमित्र परिवार,

Web Title: Todays Latest Marathi News Dev22b00184 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..