जेऊर मध्ये लंम्पीस्कीन आजाराने बैलाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेऊर मध्ये लंम्पीस्कीन आजाराने बैलाचा मृत्यू
जेऊर मध्ये लंम्पीस्कीन आजाराने बैलाचा मृत्यू

जेऊर मध्ये लंम्पीस्कीन आजाराने बैलाचा मृत्यू

sakal_logo
By

जेऊरमध्ये बैलाचा
लम्पीस्कीनने मृत्यू
देवाळे, ता. २१ ः जेऊर (ता. पन्हाळा) येथे लम्पीने बाधित बैलाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान प्रशासनाने पाच किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित केला आहे. जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. जेऊर येथे बाधित बैल आढळून येताच तालुका पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन विकास व विस्तार अधिकारी डॉ. रोहित रानभरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळचे डॉ. एस. पी. पवार, देवाळे पशुसंवर्धन परीवेक्षक डॉ. लव्हटे यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले. दरम्यान बैलाचा मृत्यू होताच पशुसंवर्धन विभागाने मोफत लसीकरण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीने गोठ्यांमध्ये औषध फवारणी तसेच रोगाबाबत सद़ृश लक्षणे आढळल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पशुसंवर्धन विभागाने केले आहे. घटनास्थळी गोकुळ संचालक अमर पाटील, चेतन नरके, मंडल अधिकारी प्रकाश वरक, ग्रामसेविका लता कणसे, रघुनाथ बुराण, सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Dev22b00216 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..