वनभोजनातून निसर्ग शाळेचा अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वनभोजनातून निसर्ग शाळेचा अनुभव
वनभोजनातून निसर्ग शाळेचा अनुभव

वनभोजनातून निसर्ग शाळेचा अनुभव

sakal_logo
By

00350
देवाळे : चहाची मळी परिसरात वनभोजन घेताना वि.मं.जेऊर शाळेचे विद्यार्थी व शिक्षक.

शालेय उपक्रमासह वनभोजन
देवाळे : ‘बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू ... झाडे, वेली, पशु-पाखरे यांच्या गोष्टी करू...’ या गदिमांच्या कवितेप्रमाणे शालेय उपक्रमाबरोबर वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केले जाते. यावेळी मुलांना आढळणारे विविध पक्षी, वृक्ष व वेलींची ओळख करून दिली जाते. पन्हाळा तालुक्यातील बांधारी व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी मसाई पठाराच्या पायथ्याशी ऐतिहासिक शाहू महाराजांच्या काळातील चहाचा मळा या जंगल परिसर, भैरवनाथ मंदिर, जेऊरला वनराईत वन भोजनाचा आनंद लुटतात. अभ्यासक्रमातील घटक उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून अनेक वर्षापासून देवाळे विद्यालय, पन्हाळा हायस्कूल, जेऊर हायस्कूल, प्राथमिक शाळा जेऊर व म्हाळूंगे तर्फ ठाणे शाळांचे विद्यार्थी व शिक्षक वनभोजनाची परंपरा जोपासून परिसरातील विशिष्ट चवदार वरण्याच्या (पावटा) आमटी व भाजीचा आनंद घेतात.