धामणी नदी कोरडी पडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी नदी कोरडी पडली
धामणी नदी कोरडी पडली

धामणी नदी कोरडी पडली

sakal_logo
By

00650

धामणी खोऱ्यात २५ गावांत टंचाई
नदी पडली कोरडी; पिकांचा प्रश्‍न गंभीर; पात्रात खड्डे मारण्याची स्पर्धा
धामोड, ता. ११ : कोनोलीपैकी पानारवाडी (ता. राधानगरी) सह धामणी नदीवरील सहा मातीच्या बंधाऱ्यांत अडविलेले पाणी संपल्याने नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे सुमारे २५ गावांत तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. नदीत जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा लागली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न येथे गंभीर बनला आहे.
धामणी प्रकल्याचे काम अनेक वर्षे रखडले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नदीवर स्वखर्चाने मातीचे घालतात. हे पाणी शेतीसाठी वापरात येते. धामणी खोऱ्यात पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो, मात्र साठवण प्रकल्प नसल्याने पाणी वाहून जाते. त्यामुळे येथे जानेवारीपासूनच टंचाई जाणवते.
सध्या राही, कंदलगावपासून पानारवाडीपर्यंत सुमारे ४० गावांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. नदी पात्रात खड्डे मारून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत चढाओढ सुरू आहे. परिसरात शेतीसह जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

कोट
धामणी खोऱ्यास वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. धामणी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे टंचाई आहे. पिके वाळू लागली असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे.
- स्वप्नील पाटील, शेतकरी कोनोली पाटीलवाडी.

Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01621 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top