एस टी सेवा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस टी सेवा पूर्ववत
एस टी सेवा पूर्ववत

एस टी सेवा पूर्ववत

sakal_logo
By

धामोड परिसरात एसटी पूर्ववत
धामोड :येथील एस. टी. सेवा पूर्ववत झाल्याने ग्रामस्थ व परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. धामोड ही मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील ग्रामस्थ येथे येतात. कोरोना काळात येथील एस.टी.सेवा विस्कळीत झाली होती. तसेच एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्व एस. टी. सेवा बंद होत्या. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. शनिवारी येथे आठवडी बाजार भरतो. तसेच परिसरातील वीस ते पंचवीस खेड्यांचा संपर्क या गावासोबत आहे. एस. टी. सेवा बंद असल्याने ग्रामस्थाची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या चार दिवसापासून एसटी सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशाची गैरसोय दूर झाली आहे. एस टी सेवा बंद झाल्याने मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे आठ किलोमीटर अंतर चालत यावे लागत होते. एस टी सुरु झाल्याने गैरसोय थांबली आहे, असे आपटाळ येथील ग्रामस्थ बाबूराव मालप यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01622 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top