धामणी प्रकल्पाबाबत आशा पल्लवित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी प्रकल्पाबाबत आशा पल्लवित
धामणी प्रकल्पाबाबत आशा पल्लवित

धामणी प्रकल्पाबाबत आशा पल्लवित

sakal_logo
By

धामणी प्रकल्पाबाबत आशा पल्लवित
आठ दिवसांत काम सुरू करण्याचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन

केरबा जाधव ः सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता.१२: धामणी भागाला वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे काम शासकीय लालफितीच्या चक्रव्यूहात सातत्याने अडकत आले आहे. गेली पंचवीस वर्षे प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. प्रशासकीय मंजुरीपासून विविध कारणांनी रखडला आहे. सध्या प्रकल्पाचे काम सुरू होत नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे आंदोलन केल्याने नवीन ठेकेदाराने तत्काळ सुरक्षा रक्कम भरली. आठ दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन संबंधित विभागाने दिल्याने प्रकल्पाच्या कामातील एक अडथळा दूर झाला असून, काम सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राही (ता.राधानगरी) येथे धामणी नदीवर ३.८५ टीएमसी क्षमतेच्या प्रकल्पास शासनाने १९९६ ला प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढला . आणि अखेर २००० मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. चौदाशे हेक्‍टर भिज क्षेत्र असलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत १२० कोटी रुपये होती. सध्या या प्रकल्पाचे मूल्य ७८२ कोटींवर गेले असून, तीन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे ४० कोटींवर रक्कम खर्च झाली आहे. या प्रकल्पास थेट अर्थसंकल्पात पैशाची तरतूद केली असून, सध्या १८० कोटी रुपयांची तरतूद आहे. पुनर्वसनाचा प्रश्नही मिटला आहे. प्रकल्पाचे सुमारे ७० टक्केवर काम पूर्ण झाले असून, केवळ घरभरणीचे काम अपूर्णावस्थेत आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर धामणी खोऱ्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
तब्बल बारा वर्षे प्रकल्पाचे काम बंद असून, धरणाच्या मुख्य बांधावर झाडे-झुडपे वाढली आहेत. त्याचबरोबर इतक्या वर्षाच्या काळात पावसामुळे अनेक ठिकाणचे मातीकाम वाहून गेले असून, त्यास भगदाडे पडली आहेत. त्यामुळे काम सुरू झाले तर ते वेस्ट वेअर कॅनॉलचे करणे सोयीचे ठरेल. प्रकल्पाचे काम सुरू व्हावे म्हणून आतापर्यंत अनेकवेळा मोर्चा, आंदोलने, मतदानावर बहिष्कार, बेमुदत उपोषण आदी विविध मार्ग धामणी खोऱ्यातील भूमिपुत्रांनी अवलंबले आहेत. सध्या काम सुरू होण्याच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवला आहे. आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

कोट
हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला आहे. धामणी प्रकल्प गेली बारा वर्षे केवळ स्वप्नच राहिले होते. शासनाने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे लेखी दिल्याने प्रकल्प पूर्ण होणार आहे.
-सयाजी पाटील, सदस्य,
धामणी प्रकल्प युवक संघर्ष समिती

Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01623 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top