धामोड येथील घरकुल योजनेची चौकशी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामोड येथील घरकुल योजनेची चौकशी करा
धामोड येथील घरकुल योजनेची चौकशी करा

धामोड येथील घरकुल योजनेची चौकशी करा

sakal_logo
By

दारात गाडी; फडात ऊस, तरी बेघर

‘प्रधानमंत्री आवास’मध्ये पात्र लाभार्थी वंचित; धामोड ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
धामोड, ता. ३१ : येथे प्रधानमंत्री आवास योजनेत सधन लोकांची नावे समाविष्ट आहेत. पक्की आरसीसी घरे व बागायतदार लोकांची नावे घालून पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी गटाविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतून १५६ पात्र लाभार्थी ठरले आहेत. लाभार्थ्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, शासकीय नोकरदारांच्या कुटुंबातील लोकांची व सधन कुटुंबातील लोकांची नावे आहेत. दारिद्र्यरेषेमध्ये पात्र लोकांची नावे वगळली आहेत. पात्र लोकांना डावलून प्रशासनाने अन्याय केला आहे.
यापूर्वी घरकुल योजनेतून अनेक धनदांडग्या लोकांनी नावे घालून गोठे व शेतात घरे बांधली आहेत. ज्यांना राहायला घरे नाहीत, ज्यांची जुनी घरे मोडकळीस आली आहेत, अशा पात्र लोकांची नावे ग्रामपंचायत प्रशासनाने का वगळली, याची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा. निवेदनावर बंडा नलवडे, अक्षय पानारी, विजय नलवडे, विठ्ठल पाटील यांच्यासह तीस जणांच्या सह्या आहेत.
ग्रामसेवक संतोष गुरव म्हणाले, ‘‘घरकुल योजनेची यादी शासनस्तरावरून प्राप्त झाली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांच्या मासिक सभेत हा विषय घेऊन निर्णय घेतला जाईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01633 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top