
गवशी (ता.राधानगरी) येथे वादळी वार्याने चार विजेचे खांब पडले.
राधानगरीत अतिवृष्टी कायम
राधानगरी : राधानगरी येथील लक्ष्मी तलावाच्या क्षेत्रात चौदाव्या दिवशी ही अतिवृष्टी कायम आहे. येथे गेल्या २४ तासात ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणामध्ये साडे पाच टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या हे धरण ६५ टक्के इतके भरले आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात २४ तासात १२६ मिलिमीटर पाऊस झाला असून ५५% भरले आहे. या जलाशयात १४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
चांदोलीत संततधार सुरूच
तुरुकवाडी : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असून कानसा, साळी, कडवी, वारणा नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. दहा दिवसांपासून चांदोली धरण व शाहूवाडी तालुक्यात पाऊस कोसळत आहे. ३४ .४० टीएमसी क्षमता असणारे चांदोली धरण ६६ टक्के भरले आहे. धरण जलाशयात २२.५७ टीएमसी साठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चोवीस तासांत ८७ तर आजअखेर १०५९ मिमी. पावसाची नोंद वारणावती प्रर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे. ८७५ क्यूसके विसर्ग वारणानदी पात्रात सुरू आहे.
कडवीत ७१ टक्के पाणी
आंबा ः धरणक्षेत्रात संततधार असल्यामुळे पश्चिमेकडील कडवी धरणात ७१ टक्के साठा झाला आहे. अडीच टीएमसी असलेल्या धरणात १.७९ टीएमसी साठा झाला आहे. धरणातून १४० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कडवी नदीवरील सवते-सावर्डे, शिरगाव, सरूड - पाटणे व कोपार्डे बंधारे पाण्याखाली आहेत. आंबा, विशाळगड, उदगिरी, परळे निनाई व येळवण जुगाई भागात वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे.
नागणवाडीत पाऊस
पिंपळगाव ः भुदरगड तालुक्यातील नागणवाडी (बारवे - दिंडेवाडी) प्रकल्प ४९.६० टक्के भरला आहे. धरणक्षेत्रात आज दिवसभर थोडी उघडीप होती. सायंकाळी पाच नंतर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
००६८८
गवशीत विजेचे खांब कोसळले
धामोड : गवशी (ता. राधानगरी) येथे वादळी वाऱ्याने चार विजेचे खांब कोसळले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेचे चार खांब मोडून डले. वीजप्रवाह सुरू असल्याने विद्युत भारीत तारांचा एकमेकांशी संपर्क होताच आवाज झाला. यावेळी रस्त्यावरून लहान मुलांसह ग्रामस्थ जात होते. प्रंसगावधान राखत ग्रामस्थांनी वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01645 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..