धामोड सत्कार कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामोड सत्कार कार्यक्रम
धामोड सत्कार कार्यक्रम

धामोड सत्कार कार्यक्रम

sakal_logo
By

००६९४
मुख्याध्यापक खामकर यांचा सत्कार
धामोड : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ‘कोजिमाशि’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक सुभाष खामकर यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अनिल पाटील होते. बँक निरीक्षक जोतिराम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बँक निरीक्षक रणजित पाटील, धनाजी भांदिगरे, निखिल पाटील, मारुती पाटील, शेतकरी सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सदाशिव कोरे, हनुमान सेवा संस्थेचे सचिव जयवंत कोतेकर, डी. बी. पाटील, के. के. जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते. शाखाधिकारी शिवाजी चरापले यांनी आभार मानले.

गंगामाई वाचन मंदिरातर्फे वक्तृत्व स्पर्धा
आजरा ः येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचलित मृत्यूंजकार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचच्या वतीने शनिवार (ता. २९) ऑगस्टला खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. पांडुरंग बिडकर (गुरुजी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा होत आहे. युक्रेन - रशिया युद्धाचे जागतिक परिणाम, कोरोनानंतरचे जग, नवीन शैक्षणिक धोरण, स्वातंत्र्याची पंचाहत्तरी, द्रष्टा लोकराजा ः राजर्षी शाहू महाराज, महाराष्ट्राचे राजकारण, केंद्रीय तपास यंत्रणा.. हे स्पर्धेसाठी विषय आहेत. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम असे बक्षीस दिले जाणार आहे. नियम व अटीनुसार स्पर्धा होईल. इच्छुकांनी वाचनालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01649 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top