म्हासूर्ली येथे विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हासूर्ली येथे विविध स्पर्धा
म्हासूर्ली येथे विविध स्पर्धा

म्हासूर्ली येथे विविध स्पर्धा

sakal_logo
By

विविध स्पर्धांतील
विजेत्यांना बक्षीस वाटप
धामोड, ता. २२ ः म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील म्हासूर्ली हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध स्पर्धा झाल्या. भाषण स्पर्धेत सोनल सुतार हिने तर निबंध लेखन स्पर्धेत हर्ष खुडे यांने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्‍घाटन मुख्याध्यापक बी. आय. दुरुगडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक ए. जी. पाटील, एस. डी. गुरव, एस. जी. सोनार, उपस्थित होते. स्वागत व्ही. एस. लाड यांनी केले. मधुभाऊ किरुळकर यांनी प्रास्ताविक केले. परीक्षक म्हणून औदुंबर पाटील, डी. डी. कलिकते, सुभाष धनवडे, बी. एम. रेडेकर, सचिन लाड यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यसैनिक महादेव परीट यांच्या हस्ते सत्कार झाला. वक्तृत्व स्पर्धा (लहान गट)- प्रथम ः अतुल भित्तम, द्वितीय- मधुरा चव्हाण. (मोठा गट)- प्रथम ः सोनल सुतार, द्वितीय- मयुरी मोहिते. निबंध लेखन (लहान गट) प्रथम- मधुरा चव्हाण, द्वितीय- ऋग्वेद सुतार, तृतीय- अतुल भित्तम.
मोठा गट ः प्रथम- हर्ष खुडे, द्वितीय अनुराधा भितम, तृतीय- सोनल सुतार. खुल्या कविता वाचन ः प्रथम- नम्रता पाटील, द्वितीय- अनुराधा भित्तम, तृतीय- सोनल सुतार, चतुर्थ- अस्मिता भित्तम. चित्रकला स्पर्धा : प्रथम- कार्तिकी मगदूम, द्वितीय- सिद्धी वडाम, तृतीय- राधिका सुतार. मोठा गट प्रथम- पियुष पाटील, द्वितीय- आदिती खोडके, तृतीय- प्रणिता पाटील.

Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01660 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..