धामणी नदीवर मातीचे बंधारे घालण्याचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी नदीवर मातीचे बंधारे घालण्याचे काम सुरू
धामणी नदीवर मातीचे बंधारे घालण्याचे काम सुरू

धामणी नदीवर मातीचे बंधारे घालण्याचे काम सुरू

sakal_logo
By

म्हासुर्लीत मातीचे बंधारे
घालण्याचे काम सुरू
धामोड, ता. २४ : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालत आहेत. धामणी नदीवर नऊ ठिकाणी असे बंधारे घालण्याचे काम सुरू आहे. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी असे मातीचे बंधारे येथे दरवर्षी घातले जातात.
राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात धामणी नदी कोरडी पडते. येथे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे चौके ते पनोरेपर्यंत नऊ ठिकाणी धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालतात. यासाठी लाखो रुपये शेतकरी स्वतः जमा करतात. जेसीबीच्या साह्याने पाच दिवस स्वतः राबून असे बंधारे घातले जातात. परिसरात उसासह अन्य पिके घेतली जातात. पावसाळ्यानंतर धामणी नदी चार महिने दुथडी भरून वाहते. मात्र मेमध्ये धामणी नदी कोरडी पडते. त्यामुळे शेतकरी दरवर्षी लाखो रुपये स्वखर्चातून मातीचे बंधारे घालतात. पिके वाचवण्यासाठी त्यांची ही केविलवाणी धडपड सुरू असते . सध्या धामणी नदीवर मातीचे बंधारे घालण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.