Sun, Feb 5, 2023

लम्पी आजाराने गायीचा मृत्यू
लम्पी आजाराने गायीचा मृत्यू
Published on : 21 December 2022, 1:57 am
धामोड येथे लम्पीने गायीचा मृत्यू
धामोड : येथे लम्पी आजाराने आणखी एका गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांत भीती निर्माण झाली आहे. जनावरांच्या मृत्यूची संख्या दोनवर पोहोचली असून, परिसरात एकूण ५२ जनावरे बाधित आहेत, तर ३० बरी झाली आहेत. तालुक्याच्या पश्चिम परिसरामधील काही गावांत ‘लम्पी’चा शिरकाव झाला आहे.