
खामकरवाडीत कार्यक्रम
00863
खामकरवाडी ः येथे कार्यक्रमात बोलताना ए. वाय. पाटील व इतर.
खामकरवाडीत सदस्य, विद्यार्थ्यांचा सत्कार
धामोड : राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ते खामकरवाडी (ता. राधानगरी) येथे नूतन सदस्य व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच कोमल हळदे होत्या. प्रास्ताविक माजी सरपंच विलास हळदे यांनी केले. पाटील म्हणाले, ‘राधानगरी तालुक्यातील पश्चिम परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.’ कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसन चौगुले, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, हिंदुराव खामकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील (गवशीकर), पंचायत समितीच्या माजी सदस्या वंदना हळदे, जयसिंग खामकर, विलास कोतेकर, आनंदा शिंदे, दिगंबर टेपूगडे, ग्रामसेवक यशवंत कुंभार, युवराज ऱ्हायकर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार राजू ऱ्हायकर यांनी मानले.