
कोते येथील आठवडी बाजाराला प्रतिसाद
कोतेत आठवडा बाजाराला प्रतिसाद
धामोड : कोते (ता. राधानगरी) येथे नव्याने सुरु झालेल्या आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरपंच राजेंद्र कोतेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ४४ व्यापारी सहभागी झाले. पहिल्याच बाजारात व्यापाऱ्यांची लाखोंची उलाढाल झाली. सरपंच दिलीप गुरव, विलास कोतेकर, उपसरपंच बाळाबाई माने, शामराव मरळकर, संतोष गुरव, डॉ. सुभाष सामंत, नामदेव जोगम, डॉ. प्रभाकर गोंधळी, गणेश पाटणकर, सागर गोते, मयुरी गुरव, डॉ. प्रवीण पाटील, लक्ष्मण गोते, जयवंत कोतेकर, पंडित गुरव, विलास पाटील, गोपाळ वडाम, रमेश पाटील, डॉ. संदीप सुतार, वसंत पाटणकर, अशोक सुतार, कृष्णात पाटील, पांडुरंग पाटील, सुरेश पाटील, तुकाराम किरुळकर, तलाठी संदीप हजारे, सचिन विभूते, प्रसाद तेली, धनाजी गुरव, संजय परीट, अर्जुन पाटील, बळवंत सुतार, विलास माने, प्रल्हाद पाटील, साताप्पा सामंत, जगन्नाथ कांबळे, धनाजी पाटील, संदीप शिवलंगन, शिपाई अजिंक्य गुरव उपस्थित होते.