
रिक्त पदे भरा
आरोग्य केंद्रातील रिक्त पदे
भरण्याची धामोडला मागणी
धामोड, ता. १३ : चाळीस गावातील रुग्णांचा आधार असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे. पाच पदे आरोग्यसेवक महिला, आरोग्य सहाय्यक महिला एक पद, एक पद वाहनचालक अशी सात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजाचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. लहान मुलांचे लसीकरण, हिवताप रुग्णाचे रक्त नमुने घेणे, साथरोगाला आळा घालणे, राष्ट्रीय कुटुंबकल्याण नियोजन, सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, सांसर्गिक आजार नियंत्रण, यासारखे विविध कार्यक्रम ही कामे प्रामुख्याने आरोग्य विभागास राबवावी लागतात. परंतु येथे अनेक पदे रिक्त असल्याने कामाचा बोजवारा उडाला आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त आहे. यामुळे रुग्णसेवेत अडचणी येतात. याची दखल घेत प्रशासनाने रिक्त असलेली पदे त्वरित भरावीत, अशी मागणी संजय जाधव यांनी व्यक्त केली.
---------------
कोट
रिक्त पदांबाबतची माहिती शासनाला कळवली आहे. शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- विनय पाटील, जिल्हा परिषद सदस्य