Sun, May 28, 2023

मानेवाडी विद्या मंदिर खो-खो स्पर्धेत प्रथम
मानेवाडी विद्या मंदिर खो-खो स्पर्धेत प्रथम
Published on : 18 February 2023, 11:53 am
00908
मानेवाडी (ता. राधानगरी) : येथील विद्यामंदिर शाळेने खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
मानेवाडी विद्यामंदिर खो-खो स्पर्धेत प्रथम
धामोड : मानेवाडी (ता. राधानगरी) येथील विद्यामंदिर शाळेने मुलींच्या मोठ्या गटात खो-खो स्पर्धेत जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक प्रथम क्रमांक पटकावला. या शाळेने सलग दुसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजय मिळवत यशाची परंपरा राखली. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू क्रीडा संकुल येथे या स्पर्धा झाल्या. यासाठी मुख्याध्यापक विश्वास पांडव, शिक्षक राहुल पाटील, रेखा कांबळे, अर्चना माळी, भिकाजी शेटे, विकास पाटील, सागर सुतार, कृष्णात रेडेकर, किशोर कुंभार, धनाजी पाटील, सोलनकर यांचे मार्गदर्शन लाभले.