Thur, June 1, 2023

सत्कार कार्यक्रम
सत्कार कार्यक्रम
Published on : 28 February 2023, 1:13 am
00942
धामोड पैकी देऊळवाडीत
ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांचा सत्कार
धामोड : धामोड पैकी देऊळवाडी (ता. राधानगरी) येथे नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. माजी उपसरपंच सुभाष गुरव अध्यक्षस्थानी होते. बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नूतन ग्रामपंचायत उपसरपंच मारुती तामकर व कविता कांबळे यांचा सत्कार झाला. यावेळी वर्षा तामकर, इंदुमती तामकर, अमृता कदम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अनिता सुतार, शुभांगी गुरव, कल्पना गुरव, श्री. खराडे, शशिकांत खडके, कृष्णा तिबिले, सागर गुरव उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सागर कांबळे यांनी मानले.