म्हासुर्ली फाटा ते बाजारीचा धनगरवाडा रस्त्यांची दूरवस्था

म्हासुर्ली फाटा ते बाजारीचा धनगरवाडा रस्त्यांची दूरवस्था

00951
धामोड : म्हासुर्ली फाटा ते बाजारीचा धनगरवाडा (ता. राधानगरी ) येथील रस्त्याची झालेली दुरावस्था (छायाचित्र : केरबा जाधव)


म्हासुर्ली फाटा- बाजारी रस्ता
वाहतुकीसाठी धोकादायक
अठरा वर्षापूर्वी झाली होती बांधणी;
धामोड, ता. २८ : म्हासुर्ली फाटा ते बाजारी धनगरवाडा (ता. राधानगरी) या पाच किलोमीटरच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खडी बाहेर पडली असून हा रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा बनला आहे. अठरा वर्षापूर्वी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता तयार करण्यात आला होता.
म्हासुर्ली फाटा ते बाजारी धनगरवाडा येथे माजी पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे अठरा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे विकासापासून कोस दूर राहिलेल्या बाजारी धनगरवाडा येथील जनतेला दळणवळणाकरिता हक्काचा रस्ता मिळाला होता. मात्र रस्ता होऊन ही शासनाच्या संबंधित विभागाने देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या या रस्त्यावरील खडी उखडली असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच मोटरसायकल घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत. गगनबावडा तालुक्यातील बावेली धनगरवाडा दरम्यान हा रस्ता जात असल्याने सदर रस्त्याला पदभ्रमंती करणाऱ्या हौशी पर्यटकांची सतत वर्दळ असते. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा शासन दरबारी मागणी करून ही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
सदर रस्त्याच्या डांबरीकरणाकडे शासनाचे असेच दुर्लक्ष होत राहिले, तर बाजारीवाडा येथील ग्रामस्थांची दळणवळणाभावी मोठ्या गैरसोय होणार आहे. तरी शासनाच्या संबंधीत विभागाने व लोकप्रतिनिधींनी सदर रस्त्यासाठी नवीन निधी मंजूर करून डांबरीकरण करावे, अशी मागणी विकास मलगुंडे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com