केळोशी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळोशी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या कायम
केळोशी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या कायम

केळोशी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या कायम

sakal_logo
By

लोंढा नाला प्रकल्पग्रस्तांच्या समस्या कायम
धामोड : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला प्रकल्पात स्वतःच्या जमिनी देय केलेल्या प्रकल्पग्रस्तांना आजही शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रकल्पग्रस्तांना शासनाने दिलेली अनेक आश्वासने पोकळ ठरली आहेत. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या तशाच कायम आहेत. येथील ५०३ हेक्टर क्षेत्राला लाभदायी ठरणारा लोंढा नाला प्रकल्प शासनाने १५ वर्षांपूर्वी बांधला. या वेळी प्रकल्पग्रस्तांना शासनाने जमीन, प्रकल्पग्रस्तांचा दाखला व नोकरी अशी आश्वासने दिली होती. गेल्या पंधरा १५ वर्षांपासून शासनाकडून येथील प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम शासनाकडून झाले आहे. अनेकदा शासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर करूनही आदेशाअभावी त्यांना केराची टोपली दाखवली गेली आहे. याबाबत प्रकल्पग्रस्त संभाजी पाटील म्हणाले, की हा प्रकल्प होण्यासाठी अनेकांनी स्वतःच्या जमिनी देय केल्या आहेत. या परिसरात बारमाही शेती होऊ लागली आहे. परंतु, शासनाने प्रकल्प होण्यापूर्वी आम्हाला दिलेल्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी प्रकल्पातून एकही पाण्याचा थेंब खाली सोडू देणार नाही.
...
नियमबाह्य फेरफार प्रकरणी उपोषणाचा इशारा
कबनूर ः येथील ग्रामपंचायतकडील असेसमेंट उतारा मिळकत क्रमांक ६२६, ६२७ व ६२८ ला चुकीचा व नियमबाह्य फेरफार नोंद केल्याबद्दल संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली नाही. याच्या निषेधार्थ येथील सामाजिक कार्यकर्ते अजित खुडे यांनी १० मार्चला पंचायत समिती भवन, हातकणंगले येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी, हातकणंगले यांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की १३ फेब्रुवारीला अर्जाद्वारे नोंद चुकीची असल्याने ती रद्द करण्याची मागणीही केली होती. मात्र, आजतागायत फेरफारमध्ये बदल करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
....
01496, 01497
विलास साळोखे यांची अध्यक्षपदी निवड
पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ल-पोर्ले येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विलास आनंदराव साळोखे व उपाध्यक्षपदी बाजीराव महादेव पोवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून के. एस. ठाकरे यांनी कामकाज पाहिले. स्थापनेपासून बिनविरोध निवडची परंपरा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पंचवार्षिक निवडणुकीतही कायम राखली. बिनविरोध निवड झालेले सदस्य असे ः यशवंत पाटील, बाबासाहेब पाटील, तानाजी पाटील, दत्तात्रय खोत, आनंदराव धनगर, हिंदुराव कांबळे, माया कंधारे, पंडित कुंभार. या वेळी माजी अध्यक्ष सुरेश पाटील, भूजंग पाटील, सर्जेराव लोंढे, महादेव चव्हाण, प्रकाश चौगुले, विश्वास पाटील, व्यवस्थापक सुभाष इंगळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.