Sun, May 28, 2023

धामोडात महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा
धामोडात महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा
Published on : 9 March 2023, 3:24 am
भाग्यश्री कांबळेचे यश
धामोड : येथील ग्रामपंचायत व व्यापारी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या रांगोळी स्पर्धेत भाग्यश्री शेखर कांबळे हिने प्रथम क्रमांक मिळवला. महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा किरुळकर अध्यक्षस्थानी होत्या. अन्य निकाल अनुक्रमे : द्वितीय : वर्षा जालींदर पाटील, तृतीय शिवानी सुरेश पाटील, चतुर्थ दीपाली पंढरी सुतार व उत्तेजनार्थ स्नेहल केरबा बोरनाक. स्पर्धेत तीसजणांनी सहभाग घेतला. परीक्षण एन. जी. नलवडे, रवींद्र पाटील यांनी केले. विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. यावेळी सरपंच रेश्मा नवणे, विद्या चौगले, माया तेली, सरिता तेली, करिश्मा पाटील, सीमा कोरे, माया चव्हाण, कविता कांबळे, नेत्रांजली कोरे, सुवर्णा पाटील उपस्थित होत्या. उपाध्यक्ष काजल पाटील यांनी आभार मानले.