Sat, June 10, 2023

रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरु
रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरु
Published on : 9 March 2023, 3:21 am
झापाचीवाडी-म्हासुर्ली
रस्त्याचे रुंदीकरण सुरू
धामोड : धामोड - म्हासुर्ली (ता. राधानगरी) मार्गावर झापाचीवाडी ते म्हासुर्ली या प्रलंबित रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. राधानगरी व गगनबावडा तालुक्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. झापाचीवाडी ते म्हासुर्ली रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्रलंबित होते. हा अरुंद रस्ता असल्याने वाहतुकीला धोकादायक होता. अवजड वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सध्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू आहे.