तुळशी जलाशयावर पर्यटकांची वर्दळ

तुळशी जलाशयावर पर्यटकांची वर्दळ

01010

धामोड जलाशयाला पर्यटकांची पसंती
धामोड, ता. २१ : जिल्ह्यातील पिकनिक पाँईट ठरलेला निसर्गसंपन्न तुळशी जलाशय पर्यटकांना खुणावत आहे. रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, वनराई पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. रविवारी तुळशी जलाशय पर्यटकांमुळे गजबजत असतो.
राधानगरी तालुक्‍याच्या पश्‍चिम परिसरात तुळशी जलाशय आहे. गगनबावड्याला जाणारा पर्यटक याच मार्गाने जातो. त्यामुळे येथील लक्ष वेधून घेणारा सनसेट, ज्योतिर्लिंग मंदिर, तलावाच्या पायथ्याशी हनुमान मंदिर, बगीचा, ऐतिहासिक किलचा येथील ही स्थळे केंद्रबिंदू आहे. कोतेमध्ये प्राचीन पांडवकालीन मंदिरे आहेत. तुळशी जलाशयावर पर्यटकांचे रेलचेल असून येथे जिल्ह्यातून पर्यटक येत आहेत.

कोट :
येथे जिल्ह्यातून पर्यटक येतात. शासकीय निवासस्थान, हॉटेल्सची संख्या अपुरी आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे.
- संजय जाधव, रहिवासी

तुळशी जलाशय पर्यटन विकासासाठी निधी मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत .
- विनय पाटील जिल्हा परिषद सदस्य
दोन वर्षांत जलाशयाला पर्यटकांनी पसंती दिली आहे .रविवारी पर्यटकांमुळे जलाशय हाउसफुल्ल असतो. येथील समस्यांबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे.
- खंडेराव गाडे, तुळशी शाखा अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com