धामणी नदी यंदा तुडुंब भरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी नदी यंदा तुडुंब भरली
धामणी नदी यंदा तुडुंब भरली

धामणी नदी यंदा तुडुंब भरली

sakal_logo
By

धामणीतील साठ्यामुळे
म्हासुर्ली, गवशी बंधारे भरले
धामोड, ता. २८ : झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य दगडी भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याने प्रकल्पातून पाणी सोडले आहे. यामुळे धामणी नदीतील म्हासुर्ली व गवशी हे मातीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. दरम्यान यावर्षी सात गावांतील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
मार्चनंतर धामणी नदी कोरडी पडते. त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. एप्रिलपासून येथे पाणीटंचाईच्या झळा धामणीतील २६ गावांना सोसाव्या लागतात. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. झापाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुख्य भिंतीच्या दगडी अस्तरीकरणाचे काम सुरू आहे. त्या कारणाने यावर्षी प्रकल्पातील पाणी सोडण्यात आल्याने धामणी नदीवरील म्हासुर्ली व गवशी मातीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न यावर्षी सुटल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.

कोट
दरवर्षी मार्चनंतर पाणीटंचाई जाणवते. पिण्याचा व शेतीचा प्रश्न गंभीर असतो. यावर्षी धामणी नदीमध्ये मुबलक पाणी असल्याने पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार नसल्याने शेतकरी समाधानी आहेत.
- रामचंद्र चौगुले, शेतकरी, म्हासुर्ली