गरिबांच्या फ्रीजला मागणी

गरिबांच्या फ्रीजला मागणी

01037
धामोड बाजारात माठ, रांजण विक्रीस
धामोड, ता. ३ : येथील परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून आठवडी बाजार ‘गरिबांच्या फ्रिज’ने फुलले आहेत. येथील आठवडा बाजारात माठ व रांजण यांना मागणी वाढली. यामुळे माठ बनवणाऱ्या कारागिरांना चांगले दिवस आले आहेत.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम धामोड व म्हासुर्ली परिसर दुर्गम व मागास आहे. या परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. फ्रिज सामान्यांना परवडणारे नसल्याने मोलमजुरी करणारे माठाला पसंती देत आहेत. येथील चार किलोमीटरवरील कुंभारवाडीत डिसेंबरमध्ये कुंभार माठ बनवण्यासाठीच्या तयारीला लागतो. माती, राख, सरपण, पाणी यांच्यापासून माठ तयार करतात. धामोड व म्हासुर्ली बाजारात माठ व रांजणाची विक्री सुरू आहे. बाजारात गुजरातमधील लाल व काळ्या मातीचे माठ विक्रीस आले आहेत. परराज्यातून आकर्षित माठांमध्ये पाणी थंड होत नसल्याने लोक स्थानिक माठाला पसंती देतात. बाजारात माठ दीडशे ते दोनशे रुपयांना विकला जात असून रांजण एक हजार रुपयेपर्यंत विकले जात आहे.

कोट :
१५ वर्षांपासून माठाची व रांजणाची विक्री करतो. फ्रिजच्या जमान्यातही माठ व रांजणाला मागणी आहे. दरवर्षी चांगली विक्री होते. परराज्यातील माठापेक्षा ग्राहक स्थानिक माठालाच पसंती देतात.
- रामचंद्र कुंभार, कुंभारवाडी, माठ व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com