
म्हासुर्लीच्या मैदानात प्रवीण पाटील विजयी
01069
म्हासुर्ली (ता. राधानगरी) : येथील कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या लढतीतील एक क्षण.
म्हासुर्लीच्या मैदानात
प्रवीण पाटील विजयी
धामोड, ता. १७ : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंगाच्या चैत्र यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत कुंभी कुस्ती संकुलाचा प्रवीण पाटील यांने गंगावेस तालमीचा इंद्रजीत मोळे याच्यावर पोकळ घिस्सा डावाने मात केली. यावेळी ६५ कुस्त्या झाल्या.
आखाडा पूजन सतीश पाटील-कोदवडेकर यांच्या हस्ते झाले. द्वितीय क्रमांकाच्या लढतीत गंगावेशच्या सौरभ माळी याने एन आय एस आखाडा दोनवडेच्या हृदयनाथ पचाकटे याच्यावर मात केली. नांदगावच्या शुभम पाटील, न्यू मोतीबागचा वैभव यादव आणि म्हासुर्लीच्या शफिक मुल्लानी यांने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अनुक्रमे तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकावला.
महिलांच्या कुस्त्यांमध्ये सिद्धी पाटील - गडमुडशिंगी, मधुरा पाटील - मरळी, राजनंदिनी नागावे - गडमुडशिंगी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. तानाजी गवसे, कुलदीप खोत, सरदार पाटील, सखाराम पाटील, कुंडलिक चव्हाण, संदीप जामदार, सुधाकर पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. दीपक वरपे यांनी निवेदक केले.
या वेळी युवराज पाटील, बाजीराव सुतार, सदाशिव कांबळे, धनाजी कांबळे, नौशाद मुलानी, तंटामुक्त अध्यक्ष आबासो पाटील, सर्जेराव चौगुले, महेश आठल्ये, दगडू फाले, हरी वडाम, रघुनाथ खुडे, संभाजी वडाम उपस्थित होते.