अवकाळी पावसामुळे धामणी परिसरात शेतीला आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसामुळे धामणी परिसरात शेतीला आधार
अवकाळी पावसामुळे धामणी परिसरात शेतीला आधार

अवकाळी पावसामुळे धामणी परिसरात शेतीला आधार

sakal_logo
By

अवकाळी पावसाने पिकांना आधार
धामोड, ता. १२ : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच धामणी नदी कोरडी पडल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाच अवकाळी पावसाने शेतीला आधार मिळाला. अवकाळी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ४५ गावांतील पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. अवकाळी पावसामुळे येथील बळीराजा सुखावला आहे.
यावर्षी धामणी नदी एप्रिलच्या अखेरीस कोरडी पडली. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न परिसरात गंभीर बनला होता. येथील शेतकऱ्याने धामणी नदीतच जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून पाणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. धामणी नदीतच दहा हजार रुपये खर्चून दहा फूट खड्डे खोदूनही पुरेसे पाणी उपलब्ध झाले नसल्याने शेतकरी अवकाळी पावसाच्या प्रतीक्षेत होता. ऊस शेती पाण्याअभावी वाळू लागली होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला असताना दोन दिवसांपासून सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ऊस शेतीला दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रियाः
धामणी नदी कोरडी पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. पाण्याअभावी सहा महिन्यांपासून जपलेले ऊस पीक वाया जाण्याची शक्यता होती. मात्र, अवकाळी पावसाने ऊस शेतीला आधार मिळाला.
- बाजीराव पाटील, शेतकरी, कोनोली पैकी पाटीलवाडी