Sat, Sept 30, 2023

कोते येथे शिबिर संपन्न
कोते येथे शिबिर संपन्न
Published on : 13 May 2023, 5:56 am
01117
कोतेमध्ये पशु उपचार शिबिर
धामोड : कोते (ता. राधानगरी) येथे पशु वंध्यत्व व सर्वरोग उपचार शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन सरपंच राजेंद्र कोतेकर यांनी केले. शिबिरात जनावरांमध्ये असलेले कृमी, घटसर्प, फऱ्या आदी रोगांसह लसीकरण करून आजारी जनावरांचे निदान करून उपचार केले. शिबिरात धनुर्वात लसीकरणासह जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले. दुधाळ जनावरांवरील वंध्यत्व निवारण विषयावर विस्ताराधिकारी डॉ. सासणे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. धामोडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सुतार, डॉ. रमेश चौगुले, परिचर श्री. खाडे, श्री. चांदणे यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास दिलीप गुरव, ग्रामसेवक संतोष गुरव, संदीप शिवलिंगन, जयवंत कोतेकर, डॉ. प्रवीण पाटील, शामराव मरळकर, गजानन पाटील, धनाजी पाटील, धनाजी गुरव उपस्थित होते.