शेती व पिण्याच्या

शेती व पिण्याच्या

02369
केळोशी : येथील तलावाची पाणी पातळी घटली आहे. (राजू कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)

लोंढा नाला तलावात २८ टक्के साठा
गतवर्षीच्या तुलनेत घट; शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न
धामोड, ता. २८ : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला तलावात २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षी आठ गावांना शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे . गतवर्षी या वेळी प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात घट झाल्याने पाणी जपून वापरण्याच्या आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
राधानगरी तालुक्यातील आठ गावांना लाभदायी ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या पाणीसाठ्याचे येथील प्रशासनाने नियोजन केले आहे. अद्यापही प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा आहे.
या परिसरात वळीव पावसाने दडी मारल्याने प्रकल्पातील पाणी पातळी खालावली आहे. या वर्षी उन्हाळा तीव्र असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. या प्रकल्पातील शिल्लक पाण्याचे पूर्णपणे नियोजन केले असून शेती व पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल. परंतु पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन येथील शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com