केळोशी बुद्रुक जंगलात स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळोशी बुद्रुक जंगलात स्वच्छता मोहीम
केळोशी बुद्रुक जंगलात स्वच्छता मोहीम

केळोशी बुद्रुक जंगलात स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

01135
केळोशी बुद्रुकला स्वच्छता मोहीम
धामोड : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला प्रकल्पाशेजारी असलेल्या जंगलात वनपाल विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी २५० किलो कचरा व १०० किलो मद्याच्या रिकाम्या बाटल्या संकलित केल्या.
जागतिक पर्यावरणानिमित्त म्हासुर्ली वन परिमंडळातील वनपाल विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवली. मोहिमेत कापडी, प्लास्टिक पिशव्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे एकत्रित संकलित करून विल्हेवाट लावली. मोहिमेत ईश्वर जाधव, उमा जाधव, ज्योतीराम कवडे, बाळू डवर, जैनुल जमादार, विलास गुरव यांनी सहभाग घेतला. यावेळी वनपाल विश्वास पाटील म्हणाले, ‘पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यावरण रक्षणाला महत्त्व द्यावे. निसर्गाची अवहेलना मानवाला त्रासदायक ठरू शकते. जागरूकतेने पर्यावरणाचे महत्त्व समजून घ्यावे.’