
राज्यमंत्री यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ः अनिल बागणे
00558
राज्यमंत्री यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त
उद्या महाआरोग्य शिबिर ः अनिल बागणे
दानोळी, ता. ३ ः राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी गुरुवारी (ता .५) महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी पत्रकाद्वारे दिली. तालुक्यात १६ ठिकाणी हे शिबिर होत आहे. सर्व केंद्रांवर त्यांच्या शेजारच्या गावातून नागरिकांना आणण्यासाठी बसची सुविधा करण्यात आली.
जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तिन्ही शहरांसह चिपरी, नांदणी, यड्राव, अब्दुललाट, टाकळी, दत्तवाड, अर्जुनवाड, अकिवाट, आलास, कवठेगुलंद, दानोळी, शिरटी, उदगाव या सर्व केंद्रांवर शिबिर होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ३० नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून निदान केले जाईल. शिबिराचे आयोजन शामराव पाटील-यड्रावकर एज्युकेशनल ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. शिबिरातून निदान झालेल्या बाधित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जातील. तसेच, गंभीर आजारावरील रुग्णांसाठी मुंबईमधील नामांकित रुग्णालयांत मोफत उपचारांची सुविधा केली जाणार असल्याची माहितीही श्री. बागणे यांनी दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00474 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..