कोथळीत बसवेश्वर जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोथळीत बसवेश्वर जयंती उत्साहात
कोथळीत बसवेश्वर जयंती उत्साहात

कोथळीत बसवेश्वर जयंती उत्साहात

sakal_logo
By

कोथळीत बसवेश्वर जयंती उत्साहात
दानोळी, ता. ४ ः कोथळी (ता. शिरोळ) येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात झाली. या वेळी पहाटे नवदाम्पत्य विनोद कुंभार, दीपक नवनाळे, शुभम आबी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले. ध्वजारोहण बबन माळी यांच्या हस्ते, तर दुपारच्या सत्रात जगतज्योती श्री. बसवेश्वर यांचा जन्मकाळ सोहळा पार पडला. सकाळी नऊ वाजता मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते बसवेश्‍वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिरोळ तालुका सहकार विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री. बसवेश्वर जयंती सोहळ्यानिमित्त रविवारी महिलांसाठी विशेष फनी गेम्स व ऑनलाइन प्रश्नमंजूषा कार्यक्रम झाले. सोमवार सकाळी रांगोळी स्पर्धा व प्रा. राजा माळगी याचे धार्मिक प्रवचन झाले. या वेळी अध्यक्षा अर्चना विभुते उपस्थित होते. कार्यक्रम लिंगायत समाज सांस्कृतिक हॉलमध्ये झाले. या वेळी विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यावरून पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली. या वेळी दिलीप मगदूम, उपसरपंच राजश्री सुतार, शिवकांत विभुते, गणेश स्वामी, बाळासो आंबी, आण्णा आंबी, प्रमोद कुंभार, अमोल परीट, किरण परीट, भाऊसो परीट, नाना परीट, प्रवीण मगदूम, ज्योती अक्कमहादेवी महिला मंडळ अध्यक्ष सुनीता मगदूम, वर्षा मगदूम, आक्काताई विभुते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अविनाश कुंभार व सूरज परीट यांनी केले. पत्रकार निखिल विभुते यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00476 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top