बाराशेवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार मोफत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाराशेवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार मोफत
बाराशेवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार मोफत

बाराशेवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार मोफत

sakal_logo
By

03040

बाराशेवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया होणार मोफत
महाआरोग्य शिबिर; मंत्री यड्रावकर यांच्या वाढदिनी १४ हजार जणांची तपासणी
दानोळी, ता. ५ : सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यामध्ये घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात १४ हजार १५० रुग्णांची तपासणी झाली. शामराव पाटील एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनतर्फे तीन शहरांसह ५३ गावांत, १६ केंद्रावर शिबिर झाले. उपचार, औषधांचे वाटप, हेल्थकार्ड वाटप झाले. शिवाय बाराशेवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया, एक हजारांवर अन्य व्याधीग्रस्तांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. जवळपास तीन हजार रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. जवळपास १२०० मोतिबिंदूचे रुग्ण आढळले. सर्व रुग्णांवर लवकरच राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हजारावर वेगवेगळ्या व्याधीग्रस्त रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, अशी माहिती शिबिराचे नियोजन प्रमुख व शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी दिली.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील तीस रुग्णालये व त्यामधील डॉक्टर, कर्मचाऱ्यां‍नी, शासनाच्या आरोग्य विभागाकडील अधिकारी, मिरज, सांगली व कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर, विद्यार्थी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले. शरद इन्स्टिट्यूटचा सर्व स्टाफ, विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दिवसभरात शिबिराच्या ठिकाणी तसेच प्रत्येक गावात वृक्षारोपणदेखील केले.

राज्यमंत्री यड्रावकरांना
मान्यवरांकडून शुभेच्छा
जयसिंगपूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. त्यांच्या येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली. खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, उत्तम पाटील, प्रांताधिकारी विकास खरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्‍वर वैंजने, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नणंदकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्के, पोलिस निरीक्षक बोरिगिड्डे, आरोग्य अधिकारी डॉ. पाखरे, टीना गवळी, शरद कारखाना, सूतगिरणीसह यड्रावकर उद्योग, शिक्षण समूहातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यड्रावकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00477 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top