पान ८ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ८
पान ८

पान ८

sakal_logo
By

00567
00566
00565

निमशिरगाव साहित्य संमेलनाचे
विविध पुरस्कार जाहीर
पुसदकर, व्ही. एन. शिंदे, कुलगुरू सावंत यांचा समावेश

दानोळी, ता.१२ ः निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थ आणि साहित्य सुधा मंचतर्फे प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या समाजरत्न, साहित्यरत्न आणि शेतकरी राजा पुरस्काराची आज येथे घोषणा केली. आदिवासी समाजात काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रभाकर पुसदकर (वर्धा) यांना दे.भ.पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार, विज्ञानविषयक लेखन करणारे डॉ. व्ही. एन. शिंदे (कोल्हापूर) यांना पी. बी. पाटील साहित्यरत्न पुरस्कार, तर कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणारे ज्येष्ठ संशोधक आणि दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांना शेतकरीराजा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या रौप्यमहोत्सवी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, अशी माहिती आज पुरस्कार निवड समितीतर्फे साहित्य सुधा मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील, पत्रकार रावसाहेब पुजारी, प्रा. शांताराम कांबळे, अजित सुतार व गोमटेश पाटील यांनी दिली.
समाजकारण, साहित्य आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना गेली १२ वर्षे हे तीन पुरस्कार निमशिरगाव येथे होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात प्रदान केले जातात. यंदाचे रौप्यमहोत्सवी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ३२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात २८ मे रोजी सकाळच्या उद्‌घाटन सत्रात प्रदान करण्यात येतील. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी, यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व निमशिरगावच्या संमेलनाचे उद्‌घाटक भारत सासणे व संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, वैभवकाका नायकवडी आणि रावसाहेब पाटील-बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00479 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top