दानोळी येथे बिरदेव परडी व जळ यात्रा शनिवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दानोळी येथे बिरदेव परडी व जळ यात्रा शनिवारपासून
दानोळी येथे बिरदेव परडी व जळ यात्रा शनिवारपासून

दानोळी येथे बिरदेव परडी व जळ यात्रा शनिवारपासून

sakal_logo
By

बिरदेव जळाची परडी यात्रा उद्यापासून
दानोळी, ता. १२ ः येथील पंचवार्षिक बिरदेव जळाची परडी यात्रा शनिवारपासून (ता. १४) सुरू होत आहे. तीन दिवस असणाऱ्या यात्रेचे नियोजन बिरदेव यात्रा कमिटी व समस्त धनगर समाजाकडून केले जात आहे. यात्रा १६ मेपर्यंत आहे. यात्रेची जय्यत तयारी केली आहे.
शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत वालुंग जमा होतील. रात्री दहा वाजता परडी जळाला जाणे व श्री बिरदेवाच्या पालखीची रथातून मिरवणूक निघणार आहे. धनगरी ढोल व कैताळाच्या अखंड गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
रविवारी (ता. १५) दुपारी बारा वाजता पालखीचे मंदिरात आगमन व देवाच्या भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. रात्री धनगर ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजता बिरदेव पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता भंडारा फोडण्याचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती बिरदेव यात्रा‌ कमिटीकडून दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00480 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top