दानोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून गावातील सर्व मंदीरांची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दानोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून गावातील सर्व मंदीरांची स्वच्छता
दानोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून गावातील सर्व मंदीरांची स्वच्छता

दानोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून गावातील सर्व मंदीरांची स्वच्छता

sakal_logo
By

00645

----------
विद्यार्थ्यांकडून दानोळीत मंदिरांची स्वच्छता
दानोळी, ता. १० ः येथील दानोळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून ‘एक तास समाजासाठी’ उपक्रमांतर्गत दानोळी व परिसरातील मंदिरांची स्वच्छता केली. शिक्षक व विद्यार्थी सकाळी गावातील सर्व मंदिरांत स्वच्छतेच्या साहित्यांसह दाखल झाले. एक तास म्हणता-म्हणता दोन-तीन तास विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली.
उपक्रमामध्ये श्री हनुमान शक्तिपीठ मंदिर, वेशातील हनुमान, नृसिंह मंदिर, गैबीसाहेब दर्गा, मशीद, महादेव, विठ्ठल, गणपती, रेणुका, बाळूमामा, बिरोबा, खंडोबा, अंबाबाई, दत्तहाळ, साई मंदिर, चांदोली व गोठणे वसाहतीतील मंदिरांची स्वच्छता केली. श्रमदानाबरोबरच समाजसेवा केल्याचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळाला. स्कूल कमिटी चेअरमन राजकुमार पाराज-पाटील यांनी उपक्रमास प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापिका सौ. श्रेया वांजुळे, पर्यवेक्षिका सौ. यू. आर. इंगळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर या स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेतला. तसेच या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवही निर्माण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00522 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..