दानोळीत झेंडूमध्ये घातल्या शेळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दानोळीत झेंडूमध्ये घातल्या शेळ्या
दानोळीत झेंडूमध्ये घातल्या शेळ्या

दानोळीत झेंडूमध्ये घातल्या शेळ्या

sakal_logo
By

00655
------------------
दानोळीत झेंडूमध्ये घातल्या शेळ्या
रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा निर्णय : दोन महिन्यांत टाकले पीक काढून
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १४ ः संततधार पाऊस, ऊन-पाऊस अशा प्रतिकूल हवामानामुळे झेंडूवर करप्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच गेल्या आठवड्यात झेंडू फुले ग्राहकांअभावी फेकून देण्याची वेळ शेतकरी व व्यापाऱ्यांवर आली होती. याला वैतागून येथील चंद्रकांत माने या शेतकऱ्याने झेंडू पिकात शेळ्या घातल्या. चार महिने चालणारे झेंडू पीक दोन महिन्यांतच काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकरी झेंडूची लागवड करताना श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळीचा हंगाम डोळ्यांसमोर ठेवतात. या काळात फुलांना दरही समाधानकारक असतो. बहुतांशवेळा चढ्या दराने फुले विकली जातात. अशी एक-दोन वेळा संधी मिळाली की, हंगामाचे पैसे मिळून जातात. या काळात चांगला दर मिळेल, अशा उद्देशाने शेतकरी या फुलांची लागवड करतात. दोन वर्षे महापूर, कोरोनाने फूल उत्पादन नुकसानीत गेले होते. काही महिन्यांपासून बाजारपेठ पूर्वपदावर येत होती. त्यातच पावसाने जोर धरला आणि फूल उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडले.
पावसामुळे दरही गडगडले. प्रतिकूल हवामानामुळे करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे रोपे खराब होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाएवढेही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी झेंडू काढून टाकत आहेत. काहींनी शेतात शेळ्या-मेंढ्या घातल्या आहेत.
-----------
कोरोनानंतर यावर्षी झेंडूला चांगली मागणी येईल, म्हणून झेंडूचे पीक घेतले. या वेळी सणात दरही मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने व ऊन-पावसामुळे रोग पडला. झाडे करपू लागली, कुजू लागली. त्यामुळे चार महिन्यांच्या या पिकात दुसऱ्या महिन्यांतच शेळ्या घालण्याची वेळ आली आहे.
-चंद्रकात माने, दानोळी

Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00526 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..