मोबदल्याबाबत सुधारित प्रस्ताव सादर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबदल्याबाबत सुधारित प्रस्ताव सादर करा
मोबदल्याबाबत सुधारित प्रस्ताव सादर करा

मोबदल्याबाबत सुधारित प्रस्ताव सादर करा

sakal_logo
By

00667

------
मोबदल्याबाबत सुधारित प्रस्ताव सादर करा
जिल्हाधिकारी रेखावर यांची सूचना; कोथळी-हरिपूर पूल भूसंपादन
दानोळी, ता. १३ ः कोथळी (ता. शिरोळ) येथील कोथळी-हरिपूर पुलाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला जिरायत शेतीचा ग्राह्य धरल्याने तो बागायत ग्राह्य धरून सुधारित मोबदला देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निदर्शनास आणून दिले. याबाबत तातडीने सुधारित प्रस्ताव सादर करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पुलाचे काम तीन वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांना बाधित शेतीचा मोबदला यावर्षी मिळणार आहे. जिरायत शेती पद्धतीने मोबदला मिळत असल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान होत असून येथे बागायती शेती आहे. त्यामुळे त्यांना बागायती शेतीप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. माजी पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, बाहुबली इसरान्ना, विपुल नांद्रे, प्रा. एस. टी. पाटील, प्रवीण मगदूम, जितेंद्र शामगोंडा आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Dnl22b00533 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..