वारणा कालव्यासंदर्भात शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील गावनिहाय सर्वे करण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणा कालव्यासंदर्भात शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील गावनिहाय सर्वे करण्याचे आदेश
वारणा कालव्यासंदर्भात शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील गावनिहाय सर्वे करण्याचे आदेश

वारणा कालव्यासंदर्भात शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील गावनिहाय सर्वे करण्याचे आदेश

sakal_logo
By

वारणा कालव्याबाबत
गावनिहाय सर्वेक्षणाचे आदेश
--
जलसंपदा, ‘श्रमुद’, वारणा कालवा समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. २५ ः वारणा उजवा कालव्याबाबत कृष्णा खोरे महामंडळ, जलसंपदा विभागाचे अधिकारी व श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांची सिंचन भवन, पुणे येथे बैठक झाली. यावेळी कालव्याचे काम लवकर सुरू करणे, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जास्तीतजास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी गावनिहाय माहिती घेऊन तसा सर्व्हे करावा, यापूर्वी शेतकऱ्यांनी केलेल्या पाणीपुरवठा योजनेला सबसिडी मिळावी, अशी मागणी केली.
यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता ह. वी. गुणाले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हे. तु. धुमाळ आणि डॉ. भारत पाटणकर, वारणा कालवा कृती समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीत वारणा कालवा संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
डॉ. पाटणकर व महादेव धनवडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची माहिती दिली. श्री. गुणाले यांनी इस्लामपूर पाटबंधारे विभाग अधीक्षक अभियंता डी. डी. शिंदे यांना हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावातील जमिनीचा सर्व्हे करून तसा अहवाल लवकर द्यावा, असा आदेश दिला.
शिरोळ हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बंद पाइपलाइनची योजना पूर्ण करावी. पूर्वी भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनासाठी संपादन करून त्या वाटप केल्या; पण त्या शेतकऱ्याला शासनाने पाणी दिले नाही. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्याच्या योजना केल्या आहेत; पण भारनियमन भरमसाट वीज बिल यामुळे पाणी वेळेवर मिळत नाही. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन योजना मार्गी लावावी, असे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले. कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे म. व. सुळे, कृती समितीचे महादेव धनवडे, संभाजी पोवार, संतोष माळी, राजेंद्र खिलारे, डी. के. बोडके, वसंत पाटील, नजीर चौगुले, केशव राऊत, गुंडू दळवी, मारुती पाटील, अशोक पाटील, बबन भोसले, दत्ता राजमाने उपस्थित होते.