15 वर्षीय मुलीने वाचविले तीन वर्षीय मुलाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

15 वर्षीय मुलीने वाचविले तीन वर्षीय मुलाला
15 वर्षीय मुलीने वाचविले तीन वर्षीय मुलाला

15 वर्षीय मुलीने वाचविले तीन वर्षीय मुलाला

sakal_logo
By

00682, B00683
फोटो - नम्रता कटारे, शौर्य कटारे
.........


१५ वर्षांच्या नम्रताकडून बुडणाऱ्या शौर्यला जीवदान

दानोळी, ता. २८ : येथील नम्रता कलगोंडा कटारे (वय १५) या मुलगीने धाडसाने विहिरीत बुडणारा आपल्या चुलत भाचा शौर्य जयकुमार कटारे (वय ३) याला वाचविले. घरी कुणी पुरुष नसताना प्रसंगावधान राखून तिने जीवाची पर्वा न करता भाच्याला वाचविले. तिच्या या धाडसामुळे परिसरातून कौतुक होत आहे.
कटारे कुटुंबीय दानोळी-जयसिंगपूर रस्त्यावर शांतीनगर येथे शेतात राहतात. शौर्य व त्याचा मोठा भाऊ ओजस हे अंगणात खेळत होते. गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस पडल्याने शेजारी ३०० फुटांवर असलेली विहीर तुडुंब भरली होती. खेळता खेळता दोन्ही मुले विहिरीकडे गेली. विहीर पूर्ण भरलेली असल्याने विहिरीचा अंदाज न आल्याने शौर्य पुढे गेला. तो पाण्यात बुडू लागल्याने ओजस ओरडू लागला. घरी पुरुष कोणी नव्हते. नम्रता घरी होती. आरडा-ओरडा ऐकून ती धावतच विहिरीकडे गेली. तोपर्यंत शौर्य विहिरीत बुडत होता. मागचा पुढचा विचार न करता तिने थेट विहिरीत उडी घेतली. त्याला घेऊनच ती बाहेर आली.
आपल्या समोर भाचा बुडत असलेला पाहून क्षणाचा विलंब न करता तिने जे धैर्य दाखवले, त्यामुळे शौर्यचा जीव वाचला. कोरोनाच्या काळात ती पोहण्यास शिकली होती. त्यानंतर तिचा फार सराव नव्हता; पण तिने घटनेचे गांभीर्य ओळखून धाडस केले.
..........

‘मी घरात होते. ओजसकडून शौर्य पाण्यात गेल्याचे मी एकले. मी धावतच विहिरीकडे गेले. पाहते तर शौर्य विहिरीच्या मध्यावर गटांगळ्या खात बुडत असलेला दिसला. मी तत्काळ विहिरीत उडी मारून त्याला मिठीत घेऊन बाहेर आले.

नम्रता कटारे
........


‘माझी चुलत बहीण नम्रताच्या प्रसंगावधान व धैर्यामुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले आहेत. थोडा जरी उशीर झाला असता तर अनर्थ झाला असता.’

जयकुमार कटारे, दानोळी