दर मिळत नसल्याने कोबी पिकात रोटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर मिळत नसल्याने कोबी पिकात रोटर
दर मिळत नसल्याने कोबी पिकात रोटर

दर मिळत नसल्याने कोबी पिकात रोटर

sakal_logo
By

82871
निमशिरगांव : येथे कोबी पिकात शेतकरी रोटर घालताना. (छायाचित्र : युवराज पाटील, दानोळी)

दर मिळत नसल्याने
कोबी पिकात रोटर
महिन्याभरापासून किलोलो २ ते ३ रुपये दर
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १५ : गेल्या महिन्याभरापासून कोबीचा दर पडला आहे. किलोला २ ते ३ रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे. अगदी पीक काढून बाजारपेठेला पाठविण्याचा खर्चही मिळणाऱ्या दरातून निघत नसल्याने शेतकरी वैतागून पिकात रोटर घालत आहेत.
जानेवारीच्या मध्यापर्यंत कोबीला किलोस १० रुपयापर्यंत दर मिळत होता. त्यानंतर मात्र दर गडगडले आहेत. ते किलोला ४ रुपयापासून २ रुपयापर्यंत खाली आले आहेत. शेतकरी महिन्याभरापासून दर वाढेल, या अपेक्षाने उत्पादन खर्च करीत आहेत, मात्र काढणी आणि पाठवणीचा खर्च पण पदरात न पडल्याने नुकसान सोसावे लागत आहे.
जिल्ह्यात ऊस गेल्यानंतर नवीन उसाच्या लागणीत आंतरपीक म्हणून कोबीचे पीक अनेकांनी घेतले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून, शेतकऱ्यांना हे आंतरपीक नुकसानकारक ठरले आहे.
दर नसल्याने शेत तयार करण्याचा, रोपे, लावण, मशागत, औषध याचा खर्च अंगावर पडत आहे. पीक तसेच ठेवले, तर त्याचा आणि औषध व मशागतीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे कोबी पीक काढून टाकण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांजवळ राहिला नाही. ज्या शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून कोबी केले आहे, त्यांचे थोडे नुकसान झाले आहे, मात्र ज्यांनी फक्त कोबीचेच पीक घेतले आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
--------------
कोट
कोबीला चांगला दर मिळेल म्हणून कोबीची लावण केली. गेल्या महिन्याभरापासून दर नाही. २० ते २२ दिवस झाले, उत्पादन चालू होऊन अवघ्या २-३ रुपये किलोने दर मिळत आहे. माल काढणी, पॅकिंग, वाहतूक, हमाली-दलालीचा खर्च हा येणाऱ्या पट्टीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेवटी उभ्या पिकात रोटर घातला.
- दादा पाटील, निमशिरगाव
---------------
शेतकऱ्यांनी उसात कोबीचे आंतरपीक केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे. २० जानेवारीपासून कोबीला दर मिळाला नाही. परवडत नसल्याने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पिकात रोटर घातले आहेत.
- जावेद हजारी, तरकारी व्यापारी, वडगाव