तीन महिन्यात वारणा नदी तिसऱ्यांदा कोरडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन महिन्यात वारणा नदी तिसऱ्यांदा कोरडी
तीन महिन्यात वारणा नदी तिसऱ्यांदा कोरडी

तीन महिन्यात वारणा नदी तिसऱ्यांदा कोरडी

sakal_logo
By

00742
00741
दानोळी : येथील वारणा नदीवरील विद्युतपंपाचे फुटबॉल उघडे पडले आहेत. दुसऱ्या छायाचित्रात पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे इंटेकवेल उघडे पडले आहेत. (छायाचित्र ः युवराज पाटील, दानोळी)

तीन महिन्यांत वारणा नदी तिसऱ्यांदा कोरडी
चिंचोली कोकरुड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे निमित्त; शेतकऱ्यांसह नागरिकांचा पाण्यासाठी आटापिटा
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १३ ः तीन महिन्यांत वारणा नदी तिसऱ्यांदा कोरडी पडली आहे. तिन्ही वेळेला शेतकऱ्यांनी ओरड केल्यानंतरच पाणी सोडण्यात आले आहे. सध्या नदीतील पाण्याची पातळी खूपच कमी झाली असून शेती विद्युतपंपाच्या फुटबॉलसह पिण्याच्या पाण्याचे इंटकवेल उघडे पडले आहेत.
चिंचोली कोकरुड बंधाऱ्याच्या पडलेल्या पिलरच्या दुरुस्ती कामानिमित्त शनिवार (ता. ४) पासून चांदोली धरणातून विसर्ग बंद केला होता. दोन-तीन दिवसानंतर विसर्ग पूर्ववत कण्यात येणार होता. मात्र, आज सायंकाळपर्यंत नदीत पाणी आले नव्हते.
नदातील विद्युतपंपाची फुटबॉल उघडे पडल्याने शेतीला पाणी देणे मुश्कील झाले आहे. नदीवरून पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी उपसा करणाऱ्या अनेक गावांच्या योजना आहेत. त्याचे इंटक (पंपगृह) उघडे पडले आहेत. काही गावांचा पाणीपुरवठा बंद झाला असून काही गावांचा पुरवठा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या शेतीला पाणी देणे आवश्यक आहे. उन्हाचा तडाखा वाढला असून भाजीपाला या तडाख्यात कोमेजून जात आहे. शेतकऱ्यांची नदीतील पाण्याच्या कमतरतेमुळे पंचायत झाली आहे.
----------------------
चिंचोली कोकरुड येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पिलर पावसाळ्यात तुटला होता. त्याच्या अंतिम व अत्यावशक दुरुस्तीसाठी विसर्ग बंद केला होता. शनिवारी (ता. ११) १८०० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला आहे. उद्यापर्यंत नदीत पाणी दाखल होईल.
- मिलिंद किटवाडकर, सहाय्यक अभियंता, कोडोली विभाग
----------------
तीन दिवसांसाठी पाणी बंद केलेला संदेश होता. दहा दिवस झाले तरी नदीत पाणी नाही. भाजीपाल्यासह पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच अनेक वारणाकाठच्या गावांत यात्रा-उरूस यांचा काळ आहे. अशा काळात शेतकरी व नागरिकांना पाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे.
- संदीप चौगुले, शेतकरी