
राजदीप थोरात यांची बैलगाडी प्रथम
00746
दानोळी ः येथे विजेत्या बैलगाडीचे जयदिप थोरात यांना राजू शेट्टी, सावकर मादनाईक, राम शिंदे आदिंच्याहस्ते बक्षीस दिले.
-------
राजदीप थोरात यांची बैलगाडी प्रथम
दानोळीमध्ये आयोजन; एक लाख ११ हजारांचे मानकरी
दानोळी, ता. २४ येथे गुढीपाडव्यानिमित्त माजी खासदार राजू शेट्टी प्रेमी ग्रुप व रामचंद्र शिंदे युवा मंच यांच्यावतीने आयोजित बैलगाडी शर्यतीत जनरल ( अ) गटातून प्रथम क्रमांकाचे १ लाख ११ हजार रुपयाचे बक्षीस राजदीप थोरात (दानोळी) यांनी पटकावले.
विजेते अनुक्रमे असे ः जनरल (अ) गट ः राजदीप थोरात, नामदेव जानकर (अंकली), गजू वलेकर (मनीवाडी). जनरल (ब) गट ः अक्षय भोसले (कानडवाडी), राहुल शिंदे (शिंदेवाडी), नितीन पाटोळे (कुटकुळी). घोडागाडी ः राजेंद्र जाधव (कसबे डिग्रज), रोहित जाधव (दानोळी), आशिष पाटील (कुरुंदवाड). बिनदाती (अदत) ः अनिल पुणेकर (अंकणे), श्रीवर्धन नागरगोजे (बेडग), दगडू मंडले (दानोळी).
विजेत्या स्पर्धकांना राजू शेट्टी यांच्याहस्ते रोख बक्षीस व शिल्ड देऊन सन्मानित केले. दानोळीमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात बक्षीस असलेल्या शर्यतीचे आयोजन केल्यामुळे शर्यत शौकिनांची गर्दी होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
सावकर मादनाईक, शैलेश आडके, भाऊ साखरपे, विठ्ठल मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पाटील, सागर शंभूशेटे, जालंदर पाटील, सचिन शिंदे, राजगोंड पाटील, महादेव धनवडे, सतीश मलमे, बापूसो दळवी, गनु गावडे, गुंडू दळवी, सुनील शिंदे, पैलवान केशव राऊत, विपुल भिलवडे आदी उपस्थित होते.