
ग्रामपंचायत कर्मचारी चार दिवस संपावर
ग्रामपंचायत कर्मचारी चार दिवस संपावर
राहूल होगले; १९ ते १३ एप्रिलदरम्यान आयोजन
दानोळी, ता. २ ः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे (पी. एन. ५१३९) १० ते १३ एप्रिल असे चार दिवस काम बंद आदोलन करणार आहेत. ही माहिती स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष राहूल होगले यांनी दिली.
राज्यातील २७,९२० ग्रामपंचायतीमधील सुमारे ६०,००० हजार कर्मचारी असून ते राज्याच्या स्थापनेपासून दुर्लक्षित आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीचे कर्मचारी काम करतात तेच काम स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी करीत आहे. तरीही किमान वेतन राज्य शासनाकडून दिले जाते. त्यावर कुटुंबाची उपजीविका चालवणे माहागाईचे निर्देशानुसार फारच कठीण आहे. कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळण्यासाठी अभय यावलकर समिती नेमलेली होती. समितीने ६ जून २०१८ रोजी राज्य शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे. समितीने सुचवलेल्या मुद्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी यांच्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे आवश्यक असून राज्य शासन ग्रामपंचायत कर्मचारी यांचे न्यायीक हक्काच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. हक्काच्या मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी १० एप्रिलपासून १३ एप्रिलपर्यंत काम बंद ठेवणार आहेत. संपात सहभागी व्हावे. असे आवाहन केले आहे.