महाआरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

महाआरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

00700
यड्राव ः येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे उद्‍घाटन करताना मल्लिकार्जुन कोरे, संजय पाटील यड्रावकर, अनिल बागणे आदी.
--------
महाआरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर वाढदिवस; केएलई हॉस्पिटलशी सामंजस्याचा करार
दानोळी, ता. ५ ः आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्‍घाटन चिदानंद कोरे साखर कारखान्याचे चेअरमन मल्लिकार्जुन कोरे यांनी केले. माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, ट्रस्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते.
श्री. कोरे म्हणाले, ‘नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी यड्रावकर यांनी हे शिबिर आयोजित केले आहे. त्यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्रातील शासकीय योजना केएलईमध्ये देण्यात येतील.’
संजय पाटील म्हणाले, ‘शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी आमदार यड्रावकर यांचा मानस आहे. त्यामुळे आमदार होण्यापूर्वीच दोन हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता जयसिंगपूर परिसरात रुग्णालय उभारून सर्वांना अत्यल्प दरात आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न आहेत.’
अनिल बागणे म्हणाले, ‘शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरचा विचार करून पुढील उपचारासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी केएलई हॉस्पिटलशी सामंजस्याचा करार केला असून यड्रावकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील शासकीय सुविधा केएलई हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहेत.’ यावेळी नागरिकांचे बी.पी., ब्लड, शुगर, एच.बी.ची तपासणी करण्यात आली. के. एल. ई. हॉस्पिटलचे दोनशेपेक्षा अधिक डॉक्टर व स्टाफ सहभागी झाले होते. रुग्णांना आवश्यक औषधे मोफत दिली. प्रत्येक रुग्णाला फळांचे किट देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. विद्या पाटील, प्रा. कल्याणी बेडेकर यांनी केले. आभार प्रा. पंकज पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com