कोथळी ग्रामस्थांचा रास्ता रोको मागे

कोथळी ग्रामस्थांचा रास्ता रोको मागे

00787
जयसिंगपूर ः येथे कोथळी येथील नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमोर एस. टी. महामंडळासंदर्भातील कैफियत मांडली.
----------------
कोथळी ग्रामस्थांचा रास्ता रोको मागे
एस. टी. फेऱ्या पूर्ववतचा नागरीक, अधिकारी यांच्या बैठकीत निर्णय
दानोळी, ता. ११ ः कोथळीतील रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर नागरिक व एसटी महामंडळाचे अधिकारी यांची बैठक आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयात झाली. यात एसटीच्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय झाला. तसेच आमदार यड्रावकर यांनी जयसिंगपूर एसटी स्टँडच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच जयसिंगपूर येथील कोथळी स्टँडचेही बांधकाम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यात वडापमुक्त म्हणून नावलौकिक असलेल्या शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे दिवसभरासाठी सुरू असणाऱ्या बस फेऱ्यांची संख्या महिनाभरापासून कमी केल्या होत्या. वेळोवेळी निवेदन व मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने येथील नागरिकांनी जयसिंगपूर एसटी स्टँड प्रवेशद्वारावर रास्ता रोको करून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. एसटीबाबतच्या तक्रारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने सांगितले असता आमदार पाटील यांनी आंदोलनाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी कुरुंदवाड आगार प्रमुख व कोथळी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्वपक्षीय नेते यांची बैठक बोलावली होती. आमदार पाटील यांनी कुरुंदवाड एसटी आगाराचे प्रमुख नामदेव पतंगे यांना गाडीच्या फेऱ्या कमी का केले असे विचारून माहिती घेतली. यानंतर विभागीय नियंत्रक कोल्हापूरच्या ए. एस. बारटक्के यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून गाड्या वाढवण्याबाबत सूचना केल्या. यानंतर नामदेव पतंगे यांनी सोमवारपासून गाड्या सुरू करत असल्याचे सांगितले. दरम्यान कोथळीतील शिष्टमंडळाने जयसिंगपूर एसटी स्टँडवर जाऊन निवारा शेड व सुरू असलेल्या गाड्याबाबत प्रत्यक्ष माहिती प्रवाशांकडून घेतली. बैठकीसाठी सरपंच भरतेश खवाटे, पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील, तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे, गौतम पाटील, ग्रामपंचायत सदस्य वृषभ पाटील, विजय खवाटे, विलास कोरवी, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com