उचगाव परिसरातील सातबारा प्रश्न ना. सतेज पाटील यांच्याकडून मार्गी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश प्रियदर्शनी कॉलनी परिसरात सातबारा वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उचगाव परिसरातील सातबारा प्रश्न  ना. सतेज पाटील यांच्याकडून मार्गी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश प्रियदर्शनी कॉलनी परिसरात सातबारा  वितरण
उचगाव परिसरातील सातबारा प्रश्न ना. सतेज पाटील यांच्याकडून मार्गी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश प्रियदर्शनी कॉलनी परिसरात सातबारा वितरण

उचगाव परिसरातील सातबारा प्रश्न ना. सतेज पाटील यांच्याकडून मार्गी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश प्रियदर्शनी कॉलनी परिसरात सातबारा वितरण

sakal_logo
By

01903
उचगाव ः येथे प्रियदर्शिनी कॉलनीतील नागरिकांना सात-बारा वाटप करताना पालकमंत्री सतेज पाटील. शेजारी आमदार ऋतुराज पाटील आणि मान्यवर.

प्रियदर्शनी कॉलनीतील रहिवाशांना
सात-बारा उताऱ्याचे वितरण

गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचा सात-बारा उतारा प्रश्न पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला. मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रहिवाशांना सात-बाराचे वितरण करण्यात आले.
या परिसरातील आणखी काही नागरिकांचा सात-बारा नावे होण्यासंदर्भातचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे बबन जाधव, मंडल अधिकारी प्रणाम भगले, तलाठी बाळासाहेब सरगर, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील जालिंदर कांबळे, राम चोकाककर, आत्माराम सव्वाखंडे, पांडुरंग जकाते, विलास मोरे, अरुण जानवेकर, सदानंद पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01121 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top