वळिवडे रस्त्यावरील वीजवाहिनीचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळिवडे रस्त्यावरील वीजवाहिनीचा धोका
वळिवडे रस्त्यावरील वीजवाहिनीचा धोका

वळिवडे रस्त्यावरील वीजवाहिनीचा धोका

sakal_logo
By

01905
गांधीनगर-वळिवडे रस्त्यावरील कमी उंचीवर असणाऱ्या वीजवाहिनी.

वळिवडे रस्त्यावर वीजवाहिनीचा धोका
काँक्रिटीकरणामुळे अंतर झाले कमी; संबंधित विभागाने लक्ष घालण्याची गरज

प्रवीण जाधव ः सकाळ वृत्तसेवा
गांधीनगर, ता.३ः गांधीनगर-वळिवडे या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने या रस्त्याची उंची वाढली. त्यामुळे या रस्त्यावरील वीजवाहिनीचे अंतर कमी झाले. परिणामी मालवाहतूक किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या जास्त उंचीच्या वाहनांना याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची उंची वाढल्यानंतर वीजवाहिनीची उंची वाढविणे गरजेचे असताना अजूनही हे काम झालेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक नेहमी धोक्याच्या छायेत वावरत आहेत.
बरेच दिवस हा रस्ता करण्याची मागणी नागरिकांतून होत होती. हा रस्त्याचे डांबरीकरणच नव्हे तर काँक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याची उंची वाढली. परंतु, रस्त्यावरील वीजवाहिनी पूर्वीच्यात उंचीवर राहिल्या. त्यामुळे रस्ता आणि वीजवाहिनीमधले अंतर कमी झाले. उंच वाहने जात असताना वीजवाहिनीचा धोका निर्माण होऊ लागला. मध्यंतरी या वीजवाहिनीमुळे एका खासगी प्रवासी बसवरील प्रवासी बॅगांना आग लागली होती. सुदैवाने त्यामध्ये जास्त हानी झाली नाही. तर दोन महिन्यांपूर्वी गवत घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीतील गवताला या वीजवाहिनीमुळे आग लागली होती. सुदैवाने ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर जागीच न थांबवता जागोजागी गवत टाकत गेला त्यामुळे मोठी हानी थांबली. यानंतर ग्रामपंचायतीनेही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांच्याच इलेक्ट्रिकल विभागाशी पत्रव्यवहार केला. परंतु, आजअखेर वीजवाहिनी आहे त्याच स्थितीत आहेत. या रस्त्यावरुन सुरू असणारी वाहतूक या वीजवाहिन्यांमुळे धोकादायक स्थितीत आहे. जर या वीजवाहिन्या लवकरात लवकर योग्य त्या उंचीवर घेतल्या नाहीत तर भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल विभागाने याबाबत गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

कोट
या रस्त्यावरील वीजवाहिनी योग्य उंचीवर घेण्याविषयी महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांशी ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार आणि संवाद केला आहे. परंतु, अजूनही याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी या तारा उंचीवर घेणे गरजेचे आहे.
-अनिल पंढरे, सरपंच, वळिवडे.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01122 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top