पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ कराव्यात - करवीर शिवसेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ कराव्यात - करवीर शिवसेना
पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ कराव्यात - करवीर शिवसेना

पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ कराव्यात - करवीर शिवसेना

sakal_logo
By

01907
कोल्हापूर ः गटविकास अधिकारी जयवंत उगले यांना निवेदन देताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू यादव व पदाधिकारी.

ओढे, गटारी साफ पावसाळ्यापूर्वी करा
गटविकास अधिकारी जयवंत उगले यांना शिवसेनेचे निवेदन

गांधीनगर, ता. ५: गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ असून, गांधीनगर मेन रोड हा उचगांव, गडमुडशिंगी, वळीवडे, चिंचवाडसह गांधीनगर अशा पाच गावांच्या हद्दीत येतो. मेनरोडपासून अगदी जवळ पंचगंगा नदी असून, मेनरोडला दुतर्फा मोठ मोठे व्यापारी संकुल आहेत. मेनरोडवरील सर्व गटारी प्लास्टीक कचरा व इतर कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. तसेच गडमुडशिंगीहून आलेला ओढ्यालाही गटारीचे स्वरूप आले असून तोही प्लास्टीक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेला आहे. पहिल्या पावसात सर्व गटारी नाले व ओढ्यातील कचरा थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळतो. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषीत होते व गटारी, ओढा तुंबल्याने गांधीनगर मेनरोडवर व तळमजल्यामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये पाणी जाऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. उचगावातील ओढाही कचऱ्याने तुडुंब भरला असून, तो ही साफ करण्याच्या सुचना द्याव्यात. गांधीनगर मुख्य रस्ताही नवीन होत असल्याने गटारी तुंबल्या की रस्त्यावर पाणी साचण्याचा धोका असून, नवीन रस्ताही खराब होण्याची शक्यता आहे. पाणी निचरा होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी या पाचही गावातील ओढे, नाले, गटारी साफ करण्याच्या सुचना संबंधित ग्रामपंचायतीला देण्यात याव्यात व पंचगंगा नदी प्रदुषण होण्यापासून रोखावे. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेने गटविकास अधिकारी जयवंत दशरथ उगले यांना दिले. उगले यांनी ग्रामसेवकांची तातडीने बैठक घेऊन याबत सूचना करण्याचे आश्वासन दिले.
करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, बाबुराव पाटील, युवासेना उपतालुका अधिकारी प्रफुल्ल घोरपडे, अजित चव्हाण, अपंग सेनेचे संदीप दळवी, दीपक पोपटाणी, दीपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी,दीपक धिंग आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01123 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top