
गडमुडशिंगीला कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळणेसाठी शिवसेनेचे निवेदन
01917
गडमुडशिंगी ः येथे कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळावा या मागणीचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देताना राजू यादव, पोपट दांगट, बाबूराव पाटील आदींसह शिवसैनिक.
गडमुडशिंगीत कायमस्वरुपी
ग्रामविकास अधिकारी द्यावा
गटविकास अधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन
गांधीनगर, ता. १२ ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळावा, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांना केली. तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट यांच्या नेतृत्वाखाली याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडमुडशिंगीची लोकसंख्या १७ ते १८ हजारांच्या आसपास आहे. या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे. सध्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे आणखी एका गावाचा कार्यभार असल्यामुळे ते कायमस्वरुपी गावामध्ये उपस्थित राहत नाहीत. ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी या सर्व बाबींचा विचार करून गावाला कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळावा. यावेळी तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, बाबूराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, अजित चव्हाण, संदीप दळवी, दीपक पोपटानी, सुनील फ्रेमवाला, सुनील पारपानी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01128 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..