टुडे ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४
टुडे ४

टुडे ४

sakal_logo
By

०१९३८
गडमुडशिंगी (ता. करवीर) ः येथील अभ्यासिका केंद्राला पुस्तके प्रदान करताना डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रदीप झांबरे, आप्पासाहेब धनवडे, अरुण शिरगावे, संतोष कांबळे आदी.


श्राद्धाला फाटा देत
अभ्यासिकेला पुस्तके

गांधीनगर, ता. २४ ः वर्षश्राद्धाला फाटा देत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील वायदंडे कुटुंबीयांनी गावातील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेला पुस्तके भेट दिली. अनाठायी होणारा खर्च टाळून त्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वांनी कौतुक केले. येथील महादेव भाऊ वायदंडे यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्या गोष्टीला वर्ष पूर्ण होत असून त्यांच्या श्राद्धाचा विषय कुटुंबासमोर पुढे आला. त्या वेळेला कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली. श्राद्धाला अनाठायी होणारा पैसा खर्च करून तो वाया घालवण्यापेक्षा एखाद्या अभ्यासिका केंद्राला पुस्तक रूपात भेट देऊन श्राद्धास येणारा खर्च विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याचे काम केले तर तेच विद्यार्थी पुस्तक वाचनातून देशाचे भविष्य घडवतील. या हेतूने वायदंडे कुटुंबाने निर्णय घेऊन गडमुडशिंगी येथील अभ्यासिका केंद्राला पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम केला. यावेळी प्रदीप झांबरे, डॉ. नंदकुमार गोंधळी, अरुण शिरगावे, संजय सकटे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन पाटील, माजी सरपंच आप्पासाहेब धनवडे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संतोष कांबळे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रतन कांबळे, संदीप गौड, संजय दांगट, संभाजी वायदंडे, मिलिंद गोंधळी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01138 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top